Gau MAta

Importance Of Desi Cow

हा काळ होता 1905 च्या आधीचा त्यावेळी इंग्रज भारतात राज्य करत होते, आणि त्यांनी भारतीय शिक्षण पद्धती, शेती आणि आरोग्य यावर आपली पकड घट्ट करायला सुरुवात केली होती. आपण रोज काय वापरायला पाहिजे आणि आपण काय शिकले पाहिजे किंवा शेती कशा प्रकारे केली पाहिजे, हे तत्कालीन अति प्रगत असणाऱ्या भारताला त्यांनी त्यांच्या सोयीनुसार शिकवायला सुरुवात केली,कधी मारून, कधी शिक्षा करून, कधी आमिष देऊन, तर कधी आपल्याला वेड्यात काढून त्यांनी त्यांना पाहिजे असलेली जगण्याची पद्धत भारतीय माणसाच्या डोक्यात घुसवयाला सुरवात केली आणि मग भारतीयाचा इंडियन कधी झाला ते कळलंच नाही, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण या त्यांच्या व्यवस्थे मध्ये कसे गुरफटून गेलो त्यावर थोडासा प्रकाश झोत टाकूया, तसेच या इंग्रजी व्यवस्थेने आपल्याला आरोग्य या गोंडस नावाखाली काय दिलं त्याबद्दल थोडंसं!!.........

१. सकाळी उठूनी देवाशी भजावे नव्हे नव्हे, सकाळी उठुनी चहाशी भजावे!! ही इंग्रजांची देन!!                 

२. सकाळी उठल्यावर आपण शौचाला बाहेर जायचो, आज तो प्रतिर्विधी आम्ही घरातच उरकतो.          

३. त्यानंतर दंतधवनासाठी अतिशय नैसर्गिक कडुलिंब किंवा भाताच तुस वापरून त्यामध्ये औषधी वनस्पतींचा समावेश करून ते मंजन म्हणून वापरलं जातं, जे वापरणाऱ्या व्यक्तीला आणि पर्यावरणाला काहीही घातक नाही उलट पूरक आहे!! आज ती जागा वेग वेगळ्या कंपन्यांचे tooth brush, tooth paste, mouth freshner यांनी घेतली ज्या मध्ये प्लास्टिक, हाडांचा चुरा, चुना,जनावरांची चरबी,आणि तत्सम घातक रसायनांचा सर्रास वापर केला जातोय की, ज्यामुळे वापरणाऱ्या व्यक्तीस Hormonal Imbalance, दातांचे आजार पोटाचे विकार, पचनाच्या समस्या आणि कॅन्सर सारख्या भयानक आजारांना बळी पडावे लागत आहे!!                    

 त्या नंतर स्नान विधी आयुर्वेदात साबण ही संज्ञा कुठेही नाही!! मग आधीचे भारतीय घाणेरडे होते का? रोगी आजारी होते का? तर अजिबातच नाही उलट अतिशय नैसर्गिक अशा गोष्टी अंगाला लावल्यामुळे ते आत्ता पेक्षा अधिक रूपवान, शिलवान, स्वच्छ आणि सात्विक वृत्तीचे होते ते अंघोळी साठी बेसन,दही,दूध,लिंबू,मुलतानी माती,हळद,कडुलिंब अशा अतिशय नैसर्गिक घटकांचा वापर करीत होते त्यामुळे त्यांच्या मध्ये स्वच्छ ते बरोबरच शुद्धताही होती, याउलट आज इंग्रजी पद्धती नुसार विविध कंपन्यांच्या मिळणाऱ्या साबणांमध्ये हेच घातक रसायन, हीच जनावरांची चरबी,SlS सारखे अतिशय घातक रसायने वापरून आपण आपली आणि पर्यायाने आपल्या नद्यांची किंवा पर्यावरणाची कशी काळजी घेतोय हे लक्षात येते!!          पूर्वी आपण पितळ्याच्या बादली मध्ये अंघोळ करायचो आज तिची जागा प्लास्टिक ने घेतली आहे!! जे कॅन्सर च सर्वात मोठ कारण ठरू शकत!!

४. सौंदर्य प्रसाधने : हा तर सर्वात मोठा धंदा बनला आहे लाखो करोडो रुपयांची लूट यामुळे होऊन आपल्या माता भगिनी सौंदर्याच्या अती हव्यासा पोटी वेळेला हे ही विसरतात की, ज्या पावडरचा वापर आपण बाथरुम धुण्यासाठी करतो तीच पावडर आपण आपल्या चेहऱ्याला लावायची? परिणामी भयानक आजार ते बरे करण्या साठी इंग्रजी औषध त्याच्या साईड इफेक्ट मधून वाचण्यासाठी परत अजून वेगळी औषध !!                  या सर्व दुष्ट चक्रातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर इंडिया कडून भारताकडे चला!!

या सगळ्यांवर उपाय म्हणजे भारतीय वंशाची गाय!!.....

1
100% Natural Farming Practices

2
100% Toxin & Poison Free Products

3
100% Rejuvenating Biodiversity